सयाजी शिंदेंनी राजकीय प्रवेशासाठी अजित पवारांचीच राष्ट्रवादी का निवडली?; म्हणाले…

मुंबई (पॉलिटिकल ब्‍युरो) : अभिनेते सजायी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे कारण डेली पॉलिटिक्‍सला सांगितले आहे. अजित पवार यांच्या कामानं मी प्रभावित झालोय. कुठंही, कोणत्याही कामात वेळकाढूपणा न करता ते तात्काळ निर्णय घेताना दिसतात, त्यांची ही कार्यशैली मला आवडते.

ते म्हणाले, की आता ५०० सिनेमे केले. त्यामुळं काही अडचण नाहीये. मला राजकारणात येऊन काही मिळवायचं नाहीये. चांगलं काम करायचं आहे. पुढच्या पाच वर्षांत ते करणार. माझ्या आतापर्यंतच्या सिनेमाच्या कारकीर्दीत अनेक राजकारण्यांशी संबंध आला. पण, अजित पवार यांच्या कामानं मी प्रभावित झालोय. कुठंही, कोणत्याही कामात वेळकाढूपणा न करता ते तात्काळ निर्णय घेताना दिसतात, त्यांची ही कार्यशैली मला आवडते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यात लोकप्रिय असून त्यामुळं गरीब, वंचित महिलांना आर्थिक पाठबळ मिळतंय. त्यामुळं मी राजकारणात येत असून पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन, असे सयाजी म्हणाले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश शुक्रवारी झाला. छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते यावेळी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!